आपल्या कुटुंबाला सक्रिय कसे ठेवावे याबद्दल थोडक्यात महत्त्वाचे.

कुटुंब म्हणून लक्षात ठेवा की संशोधन सक्रिय पालक सक्रिय मुलांचे संगोपन करतात. कुटुंबाच्या दैनंदिन वेळापत्रकात तंदुरुस्तीला नेहमीच प्राधान्य दिले पाहिजे.

अमेरिकन हार्ट असोसिएशनने शिफारस केली आहे की निरोगी मुले, दिवसभर सक्रिय राहतात. सहा आणि त्याहून अधिक वयाच्या मुलांनी दररोज किमान एक तास मध्यम ते जोरदार एक्सरसाइज केल पाहिजे. हे त्यांना निरोगी वजन राखण्यास आणि त्यांचे हृदय, मेंदू आणि शरीर निरोगी ठेवण्यास मदत करेल.

रोजच्या धावपळीच्या युगात आपल्यासाठी एक तास खूप मोठा वाटत असला तरी एक्सरसाइज साठी काही वेळ राखून ठेवणं गरजेचं आहे.

पुढे काही आयडिया दिलेले आहेत त्या फॉलो करा.

1)एन्जॉय आउट डोअर ऍक्टिव्हिटी: तुम्ही आणि तुमची मुलं एक वेळ ठरवून रोज ठराविक वेळेवर मार्ग ठरवून त्याच्यावर तुम्ही सायकलिंग किंवा ट्रेकिंग करू शकता.

2) आपल्या कुटुंबाबरोबर खेळासाठी एक वेळ ठरवून घ्या की पुढे रोज रात्री, जेवणानंतर फेरफटका मारा किंवा जेवणानंतर योगातलं आसन -वजरासन करू शकता.

3) चूज टॉईज वाईजली: बोल पतंग स्केट बोर्ड आणि दोरी उड्या , यासारखी मुलांना प्रोत्साहन देणारे खेळ निवडा.

4) स्क्रीनची वेळ मर्यादित ठेवा : तज्ज्ञांनी चेतावणी दिली आहे की स्क्रीन समोरजास्त वेळ राहिल्यामुळे तुमच्या मुलाला बरेचसे आजार होऊ शकतात, बरीच मुलं आपला वेळ मोबाईलवर घालवतात त्यामुळे दिवसातून फक्त दोन-तीन वेळेस त्यांच्या हातात मोबाईल द्या. त्यांच्या बेडरूम मधून टीव्ही लॅपटॉप आणि मोबाईल दूर ठेवा. संगणकाचा वापर फक्त शाळेपुरता मर्यादित ठेवा.

5) प्लांट गार्डन: गार्डनमध्ये रोप कशी लावायची हे शिकल्यामुळे रोज बागेत खेळायला मजा येईल व निसर्गाशी एकरूप होण्यास मदत होईल त्याचबरोबर त्यांचा जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक होईल आयुष्यामध्ये ते भरभरून प्रगती करतील.

6)छोटी घरातली काम एकत्र करा: सजावट स्वयंपाक साफसफाई आणि घरातले व्यवहार समजून घेणे नवीन नवीन गोष्टी शिकणे. त्यामुळे घरात युनायटेड राहील आणि घरातल्यांचे मनस्वस्थ आणि शारीरिक स्वास्थ सदृढ होण्यास मदत होईल.

लक्षात ठेवा आम्ही महाराष्ट्र उडान मिशन या ब्लॉगिंग मार्फत प्रत्येक प्रत्येक घराघरात सोसायटीत आणि समाजामध्ये सामंजस्य प्रस्थापित व्हावा यासाठी हा सर्व खटाटोप आहे. तरीपण तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला याच्याबद्दल आपलं मत जरूर नोंदवा. त्यामुळे आम्हाला अजून दुसरे दुसरे ब्लॉग लिहिण्यासाठी मजा येईल धन्यवाद.

आपलाच झेन…!!!

Share the Post:
Scroll to Top
×