आयात निर्यात BUSINESS कसा सुरू करावा.

परिचय

तुम्ही एक्सपोर्टर म्हणून आंतरराष्ट्रीय बिजनेस सुरू करण्याचा विचार करत असाल तर , आयात निर्यात म्हणजे काय हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. काळजी करू नका, आम्ही काही गोष्टी आमच्या अनुभवावरून तुम्हाला समजावून देणार आहोत. जे पण लोक नवीन आहेत त्यांनी घाई करू नका. आधी स्वतः हा बिजनेस समजून घ्या. कोणावरही डिपेंड राहू नका.

कोर्स करू शकता.पण कोर्स शिकवणारा किती अनुभवी आहे, हे पडताळून बघा. त्याची वेबसाईट बघा, वेबसाईटवर जाऊन रिव्ह्यू बघा. त्याचा एक डेमो लेक्चर अटेंड करा आणि मगच ठरवा , तो कोर्स करायचा आहे की नाही. घाई करू नका मन शांत ठेवा. आम्ही तुम्हाला हा बिजनेस कसा सुरू करायचा हे समजावून सांगणार आहोत.

जेव्हा बिझनेस म्हणजेच एक्स्पोर्ट म्हणजे नेमकं काय ? हा मनात प्रश्न येत असेल की कुठून सुरुवात करायची ? कशी करायची ? आणि का करायची ? याचा शोध घ्या. आणि या प्रश्नांची उत्तर मिळाली की मगच सुरुवात करा. तुमचा आंतरराष्ट्रीय इम्पोर्ट एक्सपोर्ट बिजनेस…!!!

काही बेसिक गोष्टी पुढील प्रमाणे.

1.फर्स्ट तुमच्या कंपनीचं नाव ठरवा, पण नाव ठरवताना तुमच्या कंपनीच्या पुढे इम्पोर्ट किंवा एक्सपोर्ट लागणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ- समजा तुमचं नाव अनिकेत आहे तर अनिकेत एक्स्पोर्ट , Aniket Exim किंवा अनिकेत इंटरनॅशनल.

2. https://businessnamemaker.com/ या वेबसाईटवर जाऊन तुमच्या कंपनीचं नाव तुम्ही ठरवू शकता आणि डोमेन पण चेक करू शकता.वेबसाईटच्या डोमेन अवेलेबल आहे का ते चेक करणे गरजेचे आहे.

लायसन्स .

1) तुमच्या कंपनीचं नाव ठरवल्यावर – शॉप ॲक्ट काढावा लागेल. ( तुमच्या जिल्ह्यामध्ये किंवा आपले सरकार या वेबसाईटवर जाऊन तो काढता येतो.)

2.उद्योग आधार.

3.जीएसटी काढावा लागेल ( जीएसटी असल्याशिवाय तुम्हाला Import Export लायसन्स मिळणार नाही )

4.बँकेचं Current अकाउंट ओपन करावा लागेल. ते केल्यावर तुम्हाला चेक्स चेक बुक अप्लाय करावा लागेल. त्यानंतर IEC code license सहज काढू शकता.

5. इम्पोर्ट एक्सपोर्ट लायसन्स ( IEC code ) काढण्यासाठी तुम्हाला गव्हर्मेंट च्या डीजीएफटी Dgft.in या वेबसाईटवर जाऊन काढू शकता.

6. Ad code _ ऑथराइज डीलरशिप हा कोड तुम्हाला बँकेमधून फ्री मिळेल, त्यासाठी तुम्हाला तुमच्या लेटरहेडवर एक Draft द्यावे लागेल. Authorised bank – Axis , Hdfc , Icici , state bank of indIa etc.

top 10 mobile

7. पुढचा टप्पा ( Registration-Cum Membership Certificate (RCMC) आरसीएमसी प्रत्येक प्रोडक्ट साठी एक गव्हर्मेंटची वेगळी आरसीएमसी असते.
उदाहरणार्थ तुम्ही जर एग्रीकल्चर एखादा प्रोडक्ट घेतला तर तुम्हाला APEDA.in आरसीएमसी घ्यावी लागेल. प्रत्येक इंडस्ट्रीनुसार वेगळी आरसीएमसी असते
.

8. प्रॉडक्ट सिलेक्ट झाल्यावर पुढचा टप्पा , पोर्ट आणि एअरपोर्ट रजिस्ट्रेशन त्यासाठी तुम्ही एखादा एजंट कडून किंवा ( icegate.com )आईस गेट या वेबसाईटवर जाऊन हे घेऊ शकता.

हे टप्पे पूर्ण झाले की मग तुम्ही एक्स्पोर्ट करू शकता. इथे काही सुरुवातीचे महत्त्वाचे मुद्दे मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. प्रॉडक्ट हा महत्त्वाचा विषय आम्ही याच्यानंतरच्या ब्लॉकमध्ये मांडणार आहोत. तर आमचे ब्लॉग सबस्क्राईब करायला विसरू नका.
हा ब्लॉग लिहिलेला आहे तो ( import export specialist ) तज्ञांनी लिहिलेला आहे, ते या क्षेत्रामध्ये गेली पंधरा वर्षापासून काम करत आहेत.

 1. #ImportExport
 2. #Trade
 3. #GlobalBusiness
 4. #Exporting
 5. #Importing
 6. #InternationalTrade
 7. #TradeDeals
 8. #Customs
 9. #Logistics
 10. #SupplyChain
        प्रॉडक्ट कसे निवडायचे याविषयी आम्ही सविस्तर पुढच्या ब्लॉग मध्ये लिहू.

Thank You.
Robin
Share the Post:
Scroll to Top
×