पुन्हा तरुण होण्यास विषयी.

वय वाढत जाणे नैसर्गिक आहे. परंतु आपल्यापैकी बऱ्याच जणांना अनैसर्गिक जीवन पद्धतीमुळे त्यांना अकाली वृद्धत्व येते आणि ऱ्हासजन्य रोगांचा त्रास मागे लागतो.

संपूर्ण शरीराचा हळूहळू संपूर्ण झीज होते, म्हणजेच म्हातारपण येते. शरीराची झीज होण्याचे प्रमाण जीवन पद्धतीवर अवलंबून असते, वयोमनावर नाही झीज होण्याचा वेग कमी करता येतो आणि बऱ्याच जणांमध्ये उलटा ही करता येतो. त्यासाठी त्या पुन्हा तरुण होण्याची मूलभूत तत्वे आत्मसात करावी लागतील.

वयोमानाप्रमाणे ज्या गोष्टी होतात उदाहरणार्थ रक्तदाब वाढणे, रक्तवाहिन्या लवचिकपणा जाऊन त्या निबर होणे हे नैसर्गिक असतेच असे नाही आज समाजामध्ये सामान्यपणे हे रोग सर्वत्र दिसतात, त्याचे कारण आपल्या संपूर्ण समाजाची जीवन पद्धती चुकीची आहे. परंतु अप्रगत समाजामध्ये असे आढळून येते येत नाही.त्यांच्या समाजामध्ये म्हातारपणात ही रक्तदाब वाढत नाही की रक्तवाहिन्या निबर होत नाहीत.

म्हणून जे सामान्य आहे त्यावरून ठरवायचे नसते, नैसर्गिक काय आहे त्यावरून ठरवायचे असते . ज्या गोष्टी आपण म्हातारपणामुळे होतात असे समजतो, त्या आपण स्वतःच वारंवार आपल्या शरीराचा दुरुपयोग केल्याचा परिणाम असतो. उदाहरणार्थ व्यायामाचा अभाव, अपुरी झोप आणि काळजी. दीर्घ काळाचे ऱ्हास जन्य रोग जसे हृदयरोग आणि कॅन्सर या कारणाने सुद्धा म्हातारपण लवकर येते आणि आयुष्य कमी होते याचे सुद्धा मूळ कारण चुकीची जीवन पद्धती हेच आहे.

योग्य आहार आणि योग्य विहार हे नैसर्गिक नियम आपण पाळले तर वय वाढले तरी रक्तदाब वाढणार नाही , रक्तवाहिन्या निबर होणार नाहीत, मग ते नैसर्गिक म्हणता येईल. चुकीची किंवा सदोष जीवन पद्धती हे कारण हे कारण समजल्यावर आहार आणि विहारांमध्ये म्हातारपण बऱ्याच प्रमाणात थोपवता येते.

अकाली वार्धक्याचे परिणाम.


काही महत्त्वाचे महत्त्वाचे परिणाम खाली दिले आहेत खाली दिले आहेत योग्य आहार विहारामुळे योग्य आहार विहारामुळे त्यापैकी त्यापैकी बरेचसे परिणाम आपण टाळू शकतो.

  1. अपूर्ण झोप ,सतत थकल्यासारखे वाटणे सतत थकल्यासारखे वाटणे चिडचिडेपणा.
  2. स्नायूच्या चरबीमध्ये रूपांतर होणे , त्वचेची लवचिकता नष्ट होणे, त्यामुळे त्वचेला सुरकुत्या पडणे.
  3. केस पांढरे होणे ,केसाची वाढ मंदावणे
  4. हाडांमध्ये कॅल्शियम कमी झाल्यामुळे हाडे ठिसूळ होणे व मोडणे.
  5. पाठीचे मणके झिजल्यामुळे पाठीला बाक येतो.उंची कमी होते. पाठ दुखते.
  6. दृष्टीदोष काचबिंदू व मोतीबिंदू लवकर होणे. बहिरेपणा येणे दात पडणे आणि हिरड्याचे रोग होणे.
  7. रोगप्रतिकारक शक्ती कमी होणे.
  8. हृदयाची कार्यक्षमता कमी होणे रक्तवाहिन्या निबर होणे रक्तदाब वाढणे पचनाच्या तक्रारी वाढणे .
  9. दर आठ वर्षांनी कॅन्सर होण्याची शक्यता दुपटीने वाढते हार्ट अटॅक आणि अर्धांग वायू होण्याची शक्यता वाढते संधीवाताचा नेहमी त्रास होणे.

यावरून तुमच्या लक्षात आले असेल की , म्हातारपण ही काही चांगली गोष्ट नाही. म्हणून ते टाळण्यासाठी किंवा जास्तीत जास्त दूर ढकलण्यासाठी आहार आणि विहारांमध्ये बदल करण्याचे प्रयत्न ताबडतोब करायला हवेत. आहार विहारांमध्ये बदल केल्यामुळे म्हातारपणाच्या तक्रारी टाळता येत तर येतातच: परंतु असलेल्या तक्रारी सुद्धा बऱ्या होतात आणि पूर्वीची निरोगी अवस्था प्राप्त करता येते. फक्त याला वेळ लागतो एवढेच लक्षात ठेवावे . 20-30 वर्षात झालेले दुष्परिणाम एका रात्रीत नाहीसे करता येत नाही.

Share the Post:
Scroll to Top
×