धूम्रपान आणि अकाली वार्धक्य.

तुम्ही धूम्रपान करत नसाल, परंतु तुमच्यासोबत धूम्रपान करणारा असेल तर त्याच्या धुरामुळे

( याला अप्रत्यक्ष धूम्रपान म्हणतात ) सुद्धा तुमच्यावर परिणाम होऊ शकतो.

धूम्रपान करणाऱ्यांमध्ये अकाली वारक्याचे प्रमाण जास्त आहे . त्यांच्या आयुष्यमान सुद्धा कमी असते धूम्रपानामुळे होणाऱ्या श्वसन रोगांचे प्रमाण वाढत आहे . धूम्रपान करणारे स्वतःच ते उडवून घेत आहेत. पण ते सहजपणे टाळता येण्यासारखे आहे.

धुम्रपानाचे दुष्परिणाम.

दिवसाला दोन बाकीचे सिगारेट ओढणाऱ्या माणसाला, न ओढणाऱ्यांच्या तुलनेत राहणे खाते प्रमुख होण्याची शक्यता सत्तर टक्क्यांनी जास्त असते आणि त्यांचे आयुष्य नऊ वर्षांनी कमी होते. धूम्रपणामुळे कॅन्सर होण्याची शक्यता 10 ते 25 टक्क्यांनी वाढते आणि रक्तवाहिन्यांवर परिणाम होतो .ते महत्त्वाचे कारण आहे धूम्रपणामुळे प्रतिकार शक्ती कमी होते. सर्दी पडसे खोकला व इतर संसर्गजन्य रोग वारंवार होतात. सतत आणि दीर्घकाळ थकवा जाणवतो त्वचेवर परिणाम होतो.

धूम्रपानाचे व्यसन नसलेल्या माणसांपैकी एक जण कदाचित निवृत्तीचे वय गाठू शकणार नाही,परंतु 25 सिगारेट  रोज ओढणाऱ्या पाचंपैकी एकही जण निवृत्तीचे वय गाठू शकणार नाही.

पण चांगली बातमी अशी आहे की धूम्रपान कायमचे सोडले तर आधी झालेल्या दुष्परिणाम दूर करता येतात आणि आयुष्य वाढवता येते.

अप्रत्यक्ष धूम्रपान.

हवेमध्ये पसरलेला सिगारेटचा दूर धूम्रपान न करणाऱ्यांना  घातक ठरू शकतो.हे आता सिद्ध झाले आहे  त्यांना सुद्धा फुफुसाचा कॅन्सर होऊ शकतो.घरात धुम्रपान करणाऱ्यांच्या मुलांना निमोनिया आणि ब्रोंकाइटिस रोग होतात.   विशेषतः एक वर्षाच्या आतील मुलांमध्ये त्यांचे प्रमाण जास्त आहे. कान-नाक-घशाचे आणि फुफुसांचे इतर लोक सुद्धा या मुलांना होतात.ज्या मुलांना दम्याचा त्रास आहे त्यांचा दमा वाढतो घरातील इतर लोकांना डोळ्याचे आणि घशाचे रोग होतात.

 धूम्रपानाची सवय कशी घालवावी.

 हे काम काही सोपे नाही.काही क्षणात हे व्यसन सुटेल अशी कोणतीही जादू किंवा हमखास उपाय नाही.  तरीसुद्धा लाखो लोकांनी धूम्रपान करणे सोडले आहे , ते सोडता येते धूम्रपान सोडायची मनापासून इच्छा आहे धूम्रपानामुळे आपल्या शरीरावर परिणाम होतो.अकालीवार्दके येते आयुष्य कमी होते याची मनाला तीव्रतेने जाणीव व्हायला हवी.

धूम्रपान सोडण्याची तुम्ही कोणतीही पद्धत स्वीकार.मुळात इच्छाशक्ती दांडगी हवी. ते आव्हान म्हणून स्वीकारा.सवयीवर मात करण्यात विजय मिळवण्यात मानसिक समाधान किती मिळेल याची कल्पना करा. आरोग्य तर मिळणारच आहे.  

धूम्रपान सोडण्याचे तात्काळ फायदे काय मिळतात.बघा तुमच्या तोंडाला वास येत नाही.दातांवरचे डाग नाहीसे होतात.सकाळचा खोकला येत नाहीअन्नाची खरी चव कळते.दम लागत नाही.सर्वात महत्त्वाचे म्हणजे पैसे वाचतात.
Share the Post:
Scroll to Top
×